“गोदावरी आरती” उपक्रमात का सहभागी व्हावे?

खास पालक / शिक्षकांसाठी – “गोदावरी आरती” उपक्रमात आपल्या पाल्याने / विद्यार्थ्याने का सहभागी व्हावे?

“गोदावरी आरती” हे एक साहित्यिक कलात्मक तंत्रज्ञानात्मक शैक्षणिक सांस्कृतिक संस्कारक्षम व्यासपीठ आहे.

साहित्यिक दृष्टीने विचार करता – पद्य निर्मिती, संस्कृतप्रचुर शब्द, भाषा रचना, व्याकरण तसेच छंद, वृत्त यांचा अभ्यास होतो.

सांगितिक दृष्टीने विचार करता – ताल, सूर, लय, ठेका, वाद्य, गायनपट्टी, माईक / कॅमेरा समज तसेच कराओके यांचा अभ्यास होतो.

तांत्रिक दृष्टीने विचार करता – वेबसाईट उघडणे, रेकॉर्ड करणे, अपलोड, डाउनलोड, हॅशटॅग, शेअर करणे यासारखी कौशल्यं विकसित होतात.

नवकल्पकता दृष्टीने विचार करता – मोटर कौशल्य (हात-डोळे सुसूत्रता), आत्मविश्वास, एकाग्रता, संघ-भावना वाढीस लागते आणि नवनिर्मितीचा आनंद होतो.

गोदावरी नदीचा उगम, संगम, उंची, लांबी, परिसर, पाच राज्यांतील तिचा प्रवास, विविध आख्यायिका, धरणं, तीर्थक्षेत्रें, तिची नांवें यांविषयीचे सामान्यज्ञान प्राप्त होते.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे – माता गोदावरीचे पाणी आपण रोज प्राशन करतो, वापरतो. त्यामुळे माता गोदावरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक अनोखी संधी आहे.