गोदावरी आरती गायन-वादन-नर्तन स्पर्धा

Godavari Aarti Singing-Playing-Dancing Competition | गोदावरी आरती गायन-वादन-नर्तन स्पर्धा

“गोदावरी आरती” उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या आवाज (vocal) किंवा वाद्य (instrumental) स्वरूपात, व्यक्तिगत (individual), युगल (duet) किंवा सामूहिक (group) पद्धतीने “गोदावरी आरती” रेकॉर्ड करावी. त्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.

  1. पहा [watch]: खालील नमुनादाखल सादर केलेल्या गोदावरी आरत्या पहा / ऐका.

2. सराव करा [Practice]: रेकॉर्ड करण्यापूर्वी “गोदावरी आरती” च्या खालील karaoke ट्रॅक सोबत अधिकाधिक सराव करा.

3. रेकॉर्ड करा [Record]: “गोदावरी आरती” रेकॉर्ड करताना गुणवत्ता दर्जाकडे अधिक लक्ष द्यावे. स्मार्टफोन किंवा संगणक यावर आवाजबंद खोलीत किंवा शक्य असल्यास स्टुडिओमध्ये “गोदावरी आरती” उच्चप्रतीचा ऑडिओ किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करावा. आपल्या रेकॉर्डेड आरतीचा योग्य तो गुणवत्तादर्जा तपासून आपल्या परवानगीने ती सदर संकेतस्थळावर आपल्या नावांसह सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्यात येईल.

4. शेअर करा [Share]: आपली रेकॉर्डेड गोदावरी आरती स्वतःच्या युट्युब चॅनेल्स, वेबसाईट, ब्लॉग्ज, व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशिअल मेडियावर #godavariaarti हा हॅशटॅग देऊन आपल्या मित्र-परिवारांमध्ये शेअर करा.

5. प्रमाणपत्र मिळवा [Get Certificate]: आपल्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल योग्य तो गुणवत्ता दर्जा तपासल्यानंतर “गोदावरी आरती” सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल. “गोदावरी आरती” हा उपक्रम स्पर्धा नाही, तरीदेखील उत्तेजनार्थ सर्वाधिक संस्था/शाळा/ संगीत/कला-प्रशिक्षण-संस्था सहभाग अनुक्रमे प्राचार्य, संगीत शिक्षक प्रमाणपत्र, सर्वोत्तम शिक्षक, सर्वोत्तम विद्यार्थी, सर्वोत्तम पालक, सर्वोत्तम गायक, सर्वोत्तम वादक अशा प्रवर्गानुसार योग्य वेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. “गोदावरी आरती” उपक्रम सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करा.