गोदावरी आरती हस्ताक्षर स्पर्धा
Godavari Aarti Handwriting Competition | गोदावरी आरती हस्ताक्षर स्पर्धा
आधुनिक तंत्रज्ञान युगातही सुंदर हस्ताक्षरांचे महत्व टिकून राहावे, हाताला छान वळण लागावे, आपल्या हस्तलिपीचे संवर्धन व प्रचार प्रसार व्हावा यासाठी “गोदावरी आरती हस्ताक्षर” या उपक्रमांतर्गत आपण स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरांत गोदावरी आरती लिहिणार आहोत. उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.
1. पहा [watch]: हस्ताक्षर उपक्रम मार्गदर्शनपर व्हिडीओ बघा.
2. रेकॉर्ड करा [Record]: गोदावरी आरती हस्ताक्षरांत लिहीतानाचा तुमचा विडिओ रेकॉर्ड करा.
इतर पर्याय [Other Options]: व्हिडीओ रेकॉर्ड करणे शक्य नसल्यास गोदावरी आरती हस्ताक्षरांत लिहीतानाचे तुमचे फोटो सुद्धा पाठवू शकता, परंतु स्पर्धेच्या दृष्टीने व्हिडीओला प्रथम प्राधान्य दिले जाईल.
3. रेकॉर्ड करा [Record]: स्मार्टफोन किंवा संगणक यावर आवाजबंद खोलीत उच्चप्रतीचा व्हिडीओ रेकॉर्ड करावा. आपल्या रेकॉर्डेड व्हिडीओचा योग्य तो गुणवत्तादर्जा तपासून आपल्या परवानगीने सदर संकेतस्थळावर आपल्या नावांसह सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्यात येईल.
4. शेअर करा [Share]: रेकॉर्डेड व्हिडीओ स्वतःच्या युट्युब चॅनेल्स, वेबसाईट, ब्लॉग्ज, व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशिअल मेडियावर #godavariaarti हा हॅशटॅग देऊन आपल्या मित्र-परिवारांमध्ये शेअर करा.
5. प्रमाणपत्र मिळवा [Get Certificate]: आपल्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल योग्य तो गुणवत्ता दर्जा तपासल्यानंतर “गोदावरी आरती” सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल. “गोदावरी आरती” उपक्रम सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करा.