गोदावरी आरती पुस्तिका निर्मिती स्पर्धा

Godavari Aarti Booklet Making | गोदावरी आरती पुस्तिका निर्मिती स्पर्धा

“Make Your Won Book” अर्थात् “स्वतःच बनवा स्वतःची पुस्तिका” या उपक्रमांतर्गत आपण मुद्रणकला तसेच पुस्तक बांधणीचा कृतिशील अनुभव घेणार आहोत. उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.

1. मुद्रण करा [Print]: खालीलपैकी कोणताही एक किंवा अधिक गोदावरी आरती पुस्तिका एक-पानी आराखडा घरी सुविधा असल्यास किंवा दुकानातून डाउनलोड करून प्रिंट काढा.

Booklet Design 1: Traditional (Single Sided Printing) (WxH: 5cm x 3.5cm) 4 booklets on single page – How to? video Marathi | English


Booklet Design 2: Landscape (WxH: 5cm x 7.5cm) 1 booklet on single page – How to? video English


Booklet Design 3: Portrait (TwoWxH: 5cm x 7.5cm) 2 booklets on Single page – How to? video English

इतर पर्याय [Other Options]: प्रिंट करणे शक्य नसल्यास स्वतःच्या हस्ताक्षरांत लिहिले तरी चालेल. ए४ आकाराच्या कागदावर आठ समान आयत आराखडा तयार करून सुंदर हस्ताक्षरांत गोदावरी आरतीचे फक्त श्लोक लिहा व सूचनांनुसार पुस्तिका बनवा.

2. रेकॉर्ड करा [Record] गोदावरी आरती पुस्तिका तयार करत असतानाचा तुमचा विडिओ रेकॉर्ड करा.

इतर पर्याय [Other Options]: व्हिडीओ रेकॉर्ड करणे शक्य नसल्यास गोदावरी आरती पुस्तिका तयार करत असतानाचे तुमचे फोटो सुद्धा पाठवू शकता, परंतु स्पर्धेच्या दृष्टीने व्हिडीओला प्रथम प्राधान्य दिले जाईल.

3. रेकॉर्ड करा [Record]: स्मार्टफोन किंवा संगणक यावर आवाजबंद खोलीत उच्चप्रतीचा व्हिडीओ रेकॉर्ड करावा. आपल्या रेकॉर्डेड व्हिडीओचा योग्य तो गुणवत्तादर्जा तपासून आपल्या परवानगीने सदर संकेतस्थळावर आपल्या नावांसह सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्यात येईल.

4. शेअर करा [Share]: रेकॉर्डेड व्हिडीओ स्वतःच्या युट्युब चॅनेल्स, वेबसाईट, ब्लॉग्ज, व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशिअल मेडियावर #godavariaarti हा हॅशटॅग देऊन आपल्या मित्र-परिवारांमध्ये शेअर करा.

5. प्रमाणपत्र मिळवा [Get Certificate]: आपल्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल योग्य तो गुणवत्ता दर्जा तपासल्यानंतर “गोदावरी आरती” सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल. “गोदावरी आरती” उपक्रम सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करा.