Godavari Aarti booklet workshop by Dinesh Paithankar गोदावरी आरती पुस्तिका कार्यशाळा अबालवृद्धांसाठी
नाशिकचे मुद्रण व्यावसायिक श्री. दिनेश पैठणकर यांनी अबालवृद्धांसाठी घेतलेली “स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका” कार्यशाळा #दिनेशपैठणकर #dineshpaithankar
# “Godavari Aarti Booklet | गोदावरी आरती पुस्तिका” उपक्रम काय आहे?
“Make Your Won Book” अर्थात् “स्वतःच बनवा स्वतःची पुस्तिका” या उपक्रमांतर्गत आपण मुद्रणकला तसेच पुस्तक बांधणीचा कृतिशील अनुभव घेणार आहोत.
# उपक्रमात का सहभागी व्हावे?
“गोदावरी आरती” हे एक साहित्यिक कलात्मक तंत्रज्ञानात्मक शैक्षणिक सांस्कृतिक संस्कारक्षम व्यासपीठ आहे.
– नवकल्पकता दृष्टीने विचार करता – मोटर कौशल्य (हात-डोळे सुसूत्रता), आत्मविश्वास, एकाग्रता, संघ-भावना वाढीस लागते आणि नवनिर्मितीचा आनंद होतो.
– साहित्यिक दृष्टीने विचार करता – पद्य निर्मिती, संस्कृतप्रचुर शब्द, भाषा रचना, व्याकरण तसेच छंद, वृत्त यांचा अभ्यास होतो.
– तांत्रिक दृष्टीने विचार करता – वेबसाईट उघडणे, रेकॉर्ड करणे, अपलोड, डाउनलोड, हॅशटॅग, शेअर करणे यासारखी कौशल्यं विकसित होतात.
– आणि सर्वात महत्वाचे म्हणजे – माता गोदावरीचे पाणी आपण रोज प्राशन करतो, वापरतो. त्यामुळे माता गोदावरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची हि एक अनोखी संधी आहे.
# कोणास सहभागी होता येईल?
“गोदावरी आरती” उपक्रमात खाजगी तसेच सरकारी संस्था, शाळा, प्रशिक्षण-संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक अर्थातच प्रत्येक नागरिकांस आपल्या कला सादरीकरणासह सहभाग घेता येईल.
# कसे सहभागी होता येईल?
उपक्रमात सहभागी होण्यासाठी;
1. https://www.godavariaarti.org/booklet/godavari_aarti_booklet_traditional_both_sided.pdf डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा आणि व्हिडीओमध्ये दाखविल्याप्रमाणे कृती करा.
2. https://www.godavariaarti.org/ या संकेतस्थळावर “गोदावरी आरती” उपक्रम सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करा.
#”गोदावरी आरती” उपक्रम काय आहे?
वैज्ञानिक संशोधनानुसार मानव शरीरात साधारणतः ७०% पाणी आहे, म्हणजे काय? तर गोदावरीच तुमच्या-आमच्या शरीरात नित्य वास करते आहे! नळांद्वारे घराघरांत पोहोचलेली माता गोदावरी केवळ शरीरांतच नाही, तर आपल्या मनांत संचारली पाहिजे. अन्नाशिवाय मानव तीस दिवसही जगू शकेल, परंतु पाण्याशिवाय? तीन दिवसदेखील कठीण! पाणी म्हणजे जीवन. आई ‘जन्म’ देते, तर नदी ‘जीवन’ देते. या अर्थाने – “माता गोदावरी आपली आईच आहे.” “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”.
चला तर मग, जीवनदायी माता गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी, आपण सुजाण-जागरूक नागरिक या नात्याने, येणाऱ्या नवीन पिढीसाठी “माता गोदावरी” हा एक नवीन संस्कार पेरूयात. साहित्य, संगीत, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या माध्यमांतून आपण सर्व जण मिळून माता गोदावरीचा घराघरातून जागर करूयात, माता गोदावरीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक महत्त्व गाऊयांत, माता गोदावरीची मनोभावे शब्दसंगीत-पूजा करूयांत, नित्य-आरती करूयांत, “गोदावरी आरती” या उपक्रमांत कर्तव्यबुद्धीने सहभागी होऊयांत.
कार्यशाळा सहभागी;
१. श्री. दिनेश पैठणकर (कार्यशाळा सादरकर्ते)
२. कु. मेघना वर्तक (विद्यार्थिनी)
३. कु. गिरीजा वर्तक (विद्यार्थिनी)
४. कु. वेदिका दिनेश पैठणकर (विद्यार्थिनी)
५. श्री. शिरीष हिंगणे (कॅमेरा सौजन्य)
copyrights: https://www.godavariaarti.org
Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-c…
Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy…
#godavariaarti | http://www.GodavariAarti.org