युवकांमध्ये गोदावरी जनजागृतीसाठी “गोदावरी जन्मोत्सव सप्ताह, राज्यस्तरीय विविध स्पर्धा”आयोजन
माघ शुक्ल दशमी, १९ फेब्रुवारी २०२४ रोजी येणाऱ्या गोदावरी-जन्मोत्सवाचे औचित्य साधत, युवकांमध्ये गोदावरी जनजागृती व्हावी यासाठी गोदावरी.ऑर्ग तर्फे “गोदावरी जन्मोत्सव सप्ताह” साजरा केला जात आहे. १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत गायन-वादन-नर्तन, पुस्तिका-निर्मिती, हस्ताक्षर-लेखन, निबंध, प्रश्नमंजुषा, व्हिडीओ-निर्मिती, पाणीप्रश्नविषयक नवकल्पना अशा विविध राज्यस्तरीय स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धांसाठीची प्रक्रिया व नियम विषयक माहिती https://www.godavariaarti.org/ या वेबसाईट वर उपलब्ध आहे. सर्व स्पर्धा विनामूल्य असून प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे. या संधीचा फायदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून त्यांना एकाहून अधिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन “गोदावरीआरती.ऑर्ग” तर्फे सर्व विषय शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच पालकवर्गाला करण्यात आले आहे.